पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
1027

चऱ्होली, दि. ६ (पीसीबी) – विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) दुपारी बारा वाजता चऱ्होली बुद्रुक येथे पठारेमळा येथे करण्यात आली.

सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय 26, रा. सोळू, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल सूर्यवंशी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथे लोहगाव रोडवर एक तरुण संशयितपणे फिरत असून त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लाऊन सोमनाथ पाटोळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.