पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
1024

पिंपळे निलख, दि. ३० (पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 28) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथील नवीन डीपी रोडवर करण्यात आली.

आदित्य दशरथ अवचरे (वय 19, रा. बालेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मयूर अवचरे (रा. काटेपूरम चौक, सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुमित देवकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य याने त्याच्याकडे विनापरवाना पिस्टल बाळगले. याबाबत दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लाऊन आदित्य याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याने हे पिस्टल आरोपी मयूर याच्याकडून आणले असल्याचे चौकशीत समोर आल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.