मावळ, दि.२७ (पीसीबी)- बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली. आहे त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि सात जिवंत कडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 24) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास शिरगाव येथे करण्यात आली.
नवनाथ हरिभाऊ गोपाळे (वय 36, रा. शिरगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार समाधान फडतरे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्याकडे बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या बाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि सात जिवंत काडतुसे असा 41 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.