पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0
301

सांगवी, दि. १९ (पीसीबी) – पिस्टल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे करण्यात आली.

सुजल राजेंद्र गिरी (वय 18, रा. जुनी सांगवी), रीहान आरिफ शेख (वय 19, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार आकाश खंडागळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील गणपती विसर्जन घाटावर दोघेजण संशयितरित्या थांबले असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 25 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल, एक हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे, दुचाकी असा एकूण 46 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.