पिस्‍टल बाळगणार्‍या तरुणास अटक

0
113

तळेगाव,
दि. २३ जुलै (पीसीबी) – पिस्‍टल व एक जिवंत काडतूक बाळगणार्‍या एका पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 22) दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास मावळ तालुक्‍यातील इंदोरी परिसरात करण्‍यात आली.

रोहण गोरख सरक (वय 21, रा. अल्‍पनगरी, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. गुन्‍हे शाखा युनिट क्रमांक दोनमधील पोलीस हवालदार जयवंत जगन्‍नाथ राऊत यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी रोहण याच्‍याकडे पिस्‍टल असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी रोहण याला इंदोरी गावाकडे येणार्‍या रस्‍त्‍यावर कॅटबरी कंपनीच्‍या भिंतीलगत कारवाई करीत ताब्‍यात घेतले. त्‍यांची झाडती घेतली असता त्‍याच्‍याकडे 50 हजार 500 रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्‍टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलीस उपनिरीक्षक रेळेकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.