पिकांचे नुकसान केल्याबाबत 17 जणांविरोधात गुन्हा दाखल

0
431

हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) – शेतातील खोलीत आग लावून साहित्य जाळले. त्यानंतर सोयाबीनचे पीक काढून नुकसान केले. याप्रकरणी 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 2) सकाळी कासारसाई येथे घडला.

रामचंद्र साधू गायकवाड, सचिन गायकवाड, अजित रामचंद्र गायकवाड, रणजित रामचंद्र गायकवाड, शाम अंकुश शितोळे, इतर 10 ते 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात गेल्या असता त्यांच्या शेतातील पत्र्याची खोली आणि त्यातील साहित्य जाळले. दहा ते बारा गुंठे क्षेत्रातील सोयाबीनचे पीक काढून नुकसान केले. रामचंद्र गायकवाड याने फिर्यादीस शिवीगाळ केली. ही जागा आमची असून तू इथून निघून जा. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. तुम्हाला सहा महिने जेलमध्ये टाकू. तुझ्या संपूर्ण कुटुंबाला पॅरालिसिस करेन अशी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.