पिकपच्या धडकेत दोन महिला जखमी

0
53

निगडी, दि. 11 (पीसीबी) –

देवदर्शनासाठी पायी जात असलेल्या महिलांना एका पिकपने धडक दिली. त्यामध्ये दोन महिला जखमी झाल्या. त्यानंतर पिकपने एका घराला धडक दिली. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास यमुनानगर निगडी येथे घडली.

दयाराम सुनील जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या पिकप चालकाचे नाव आहे. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, त्यांची जाऊ तसेच त्यांच्या मुली असे देवदर्शनासाठी पायी चालत जात होत्या. त्यावेळी पिकअपने त्यांना धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी महिला आणि त्यांची जाऊ या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर पिकपने एका घराला धडक देऊन घराची भिंत तोडून नुकसान केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.