पिकपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0
112

महाळुंगे, दि. ०३ (पीसीबी)

कुरळी येथील स्पाईसर चौकात पिकअपने एखा दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 2) दुपारी घडली.

संदीप उत्तम कांबळे (वय 44, रा. चऱ्होली, ता. हवेली) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकप (एमएच 20/ईएल 5632) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्पायसर चौक कुरळी येथून दुचाकीवरून जात होते. सिग्नल वरून पुढे जात असताना त्यांच्या दुचाकीला पिकअपने धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर पिकप चालक घटनास्थळावरून पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.