पिएमटी वाहक चालकाशी घातलेल्या हुज्जतीवरून महिले विरोधात गुन्हा दाखल

0
187

पुणे, दि. १ (पीसीबी) – पिएमटी बस मध्ये सुट्ट्या पैशावरून वाद झाल्याने महिलेने बस चालक व वाहक विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आता परस्पर विरोधी तक्रार देत महिला व तिच्या नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवारी (दि.28) तळेगाव दाभाडे येथे घडली होती.

नवनाथ व्यंकटराव ढगे (वय 28 रा. मोई,खेड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महिला, व तिचे दोन पुरुष नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,महिलेचे व फिर्यादी तसेच बस चे वाहक यांच्यात तिकिटाच्या सुट्ट्या पैशावरून वाद झाला होता. यावेळी महिलेने पोलिसांकडे बस चे वाहक व चालक यांनी गैरवर्तणूक केली . तसेच त्यांनी फोन मध्ये चित्रीकरण केले अशी तक्रार दिली होती. तर या विरोधात तक्रार देत फिर्यादी यांनी म्हटले आहे की, आरोपी महिला ही बस मध्ये पुढच्या दरवाज्यातून चढली,तिने सुट्ट्या पैशावरुन वाहकाशी वाद घातला. यावेळी तिने फिर्यादी यांना तुमची लायकी काय आहे माहिती आहे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी तिचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली असता ती अंगावर धावून आली व तिने मोबाईल हिसकावून घेत फिर्यादी च्या हाताचा चावा घेतला. या घटनेनंतर फिर्यादी यांनी बस पोलीस ठाणे येथे घेण्यास चालू केली असता महिलेने तिच्या इतर नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. तसेच तिच्या नातेवाईकांनी बस अडवून आत येत फिर्यादी व वाहकाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.