पिं.चिं भाजपा शहराध्यक्ष श्री.शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी विधानसभेतील महापुरुषांचे स्मारके स्वच्छ करुन पुष्पहार अर्पण ….

0
165
  • पिंपरी विधानसभेतील भाजपा कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम…

पिं.चिं भाजपा शहराध्यक्ष मा.शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभेती भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शंकरभाऊं जगताप यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देण्यात आली.देशात सर्वत्र लोकसभेची प्रचाराची जोरदार तयारी सुरु असताना वाढदिवसाच्या दिवशी महापुरुषांना अभिवादन करुन व तेथील स्वच्छता करण्याचा संकल्प या वेळी सर्व पदाधिकारी यांनी केला, या वेळेस पिंपरी विधानसभेतील सर्व महापुरुषांचे स्मारक स्वच्छ करून त्यांना पुष्पहार अर्पण मानवंदन करण्यात आले. समाजात वेळोवेळी सामाजिक कार्य भाजपा शहराध्यक्ष यांच्या हातून घडत असतात, त्यामधे स्व.लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य शिबिर असो, दिव्यांगां ना मदत म्हणून,बचत गट महिलांसाठी योगदान, शालेय विद्यार्थी साहित्य वाटप असो, आशा विविध सामाजिक कामातून शंकर भाऊ नेहमीच जनसामान्यात त्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहतात. स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व त्यांचा सर्व परिवार हा नेहमीच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय अशा विविध क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निवारण ही करीत असतात , सामजिक दृष्ट्या महापुरुषांचा वारसा जपणारे जगताप कुटुंब व त्यातील शंकर भाऊ जगताप यांच्या वाढदिवशी समाजातील महापुरुषांचे स्मारक स्वच्छ करून त्यांना अभिवादन करून लक्ष्मण भाऊंच्या कामाचा वारसा जपण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले.

या मधे प्राधिकरणातील लोकमान्य टिळक स्मारक, चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे व  वासुदेव बळावंत फडके,केएसबी चौक येथील छत्रपती शाहू महाराज स्मारक, मनपा येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक,पिंपरी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,एच ए कॉलोनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कासारवाडी येथिल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,दापोडी पोलीस चौकी शेजारी येथील शाहिद भगतसिंग स्मारक,पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, निगडी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, पिंपरी येथील शहीद हेमू कलानी यांचे स्मारक आशा विविध ठिकाणी या स्मारकांची स्वच्छता करुन पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,

उपक्रमाविषयी बोलताना पिंपरी विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख अमित गोरखे म्हणाले, भाजपा शहराध्यक्षांचा वाढदिवस सामाजिक भान ठेवून साजरा करण्याचे आम्ही सर्व पिंपरी मधील भाजपा कार्यकर्त्यांनी ठरवले व यामध्ये सर्वांनी संपूर्णतः मनापासून स्वच्छता अभियानात काम केले व त्याचा आनंदही आम्हाला मिळाला महापुरुषांचे स्मारके नेहमी स्वच्छ असावीत याचेच भान ठेवून हे अभियान राबविण्यात आले व यापुढेही याकडे लक्ष देणार आहोत असेही ते म्हणाले, माननीय शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम करता आला याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

या उपक्रमात पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे सह भाजपा ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे ,महिला अध्यक्ष सुजाता पालांडे, संजय मंगोडेकर, रोहिणीताई रासकर, विजयाश्री ननावरे,नंदू कदम, राजेंद्र बाबर , गणेश लंगोटे,सतीश नागरगोजे, धरम वाघमारे, सागर बहिरवडे, नेताजी शिंदे ,मनीषा शिंदे, प्रदीप कुमार बेंद्रे, गणेश ढाकणे, संभाजी नाईकनवरे, गणेश वाळुंजकर ,कैलास सानप ,सागर फुगे, विशाल वाळुंजकर, प्रशांत शिंदे,धर्मेंद्र क्षीरसागर, जयेश चौधरी, चंद्रकांत शिंदे. ओम प्रकाश शर्मा, शशिकांत गाडेकर आदी पदाधिकारी सामील झाले.