पिंपळे सौदागर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 12 एप्रिल रोजी सकाळी पिंपळे सौदागर येथील बीआरटी बस थांब्याजवळ घडली.
एम डी फैजान (वय 21, रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फुकरान खान मोहम्मद अक्रम (वय 25, रा. गोखले नगर, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र पिंपळे सौदागर येथील बीआरटी बस थांब्याजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका वाहनाने त्याला धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटना स्थळावरून पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.










































