पिंपळे सौदागर येथे मोबाईल दुकान फोडले

0
475

पिंपळे सौदागर दि. १३ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथे अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले. दुकानातून 24 हजार 650 रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आली.

परमेश्वर सुरेश तपासे (वय 28, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचे देव मोबाईल शॉप नावाचे दुकान फोडले. दुकानातून मोबाईल फोन, स्मार्टवॉच, बोट कंपनीचे एअरपोट्स, एअर बड्स, प्रो कंपनीचे एअरपोट्स, स्पीकर असे 24 हजार 650 रुपयांचे साहित्य चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.