पिंपळे सौदागर येतील प्रशासकीय दवाखाण्याचा विस्तार करा

0
420

– सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांची मागणी

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपळे सौदागर येतील प्रशासकीय दवाखाण्याचा लवकरात लवकर विस्तार करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे. महापालिका आयुक्त यांना त्याबद्दलचे निवेदन जाधव यांनी दिले.

आपल्या पत्रात ते म्हणतात, पिंपळे सौदागर येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना १९८६ ला स्थापना झाला. तेव्हापासुन आज पर्यंत व्यवस्थित सुरु आहे. दवाखाण्यातील स्टाफ व सेवक वर्ग अतिशय नम्रपणे काम करत असल्याने पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील जवळजवळ १ ते दिड लाख लोकसंख्या असलेल्या भागातुन लोक म्हणजे रूग्णसेवा घेतात. दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडी ची सेवा घेतात.संपुर्ण भागात राष्ट्रीय रूग्ण सेवकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. बालक लसीकरण मोहीम ही यशस्वीपणे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी,निदान व उपचार त्याच ठिकाणी केले जातात. परीणामी रुग्ण संख्या रोजच वाढत असते. सर्व रुग्णांची आवश्यकते नुसार रक्त तपासणी ह्याच ठिकाणी उपलब्ध आहे.गरोदर माता तपासणी व प्रसृती नंतर आरोग्य सेवेचे ही काम ह्याच ठिकाणी उपलब्ध आहे.अश्या अनेक सोईसुविधा युक्त दवाखाना असल्या कारणाने सहाजिकच अतिभार व गैरसोयचा सामना रुग्णा बरोबर कर्मचारी वर्गासही सहन करावा लागतो आहे.

दवाखाना हा साधारणपणे ५०० स्क्वेअर फूट मध्ये सुरु आहे.दवाखाण्यांची इमारत बहुमजली असुन सुद्धा त्याचा फायदा रूग्णांसाठी होत नाही ही बाब आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णालयाचा विस्तार करावा अशी मागणी जाधव यांनी केली आहे.