पिंपळे सौदागर मध्ये  हजारोंच्या साक्षीने भव्य दिव्य “न भूतो न भविष्यति” असा रावण दहन सोहळा संपन्न…..

0
555

पिंपळे सौदागर, दि. २५ (पीसीबी) – मंगळवार दि.२४/१०/२०२३ रोजी सायं.६ वाजता विजयादशमी निमित्ताने नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने आणि श्री जयनाथ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर याठिकाणी पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील सर्वात भव्य दिव्य असा रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला. यंदाचा विजयादशमी कार्यक्रम पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी आकर्षक ठरला . विशेष म्हणजे जय श्रीराम नावाचा जयघोष करीत १२० फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले सुनील अनिल तिलकधारी, हिसार (हरियाणा) यानी हनुमान पात्र साकारत उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच या कार्यक्रमात टाईम पास -३ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे, तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया  देवधर आणि प्रसिद्धी दिग्दर्शक अभिनेते श्री प्रवीण तरडे या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या विशेष शैलीत उपस्थित नागरिकांशी संवाद सादत त्यांच्या आवडत्या गाण्यावर ठेका धरून , चित्रपटातील फेमस डायलॉग म्हणत मनोरंजन करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली. 

या कार्यक्रम दरम्यान पिंपळे सौदागर येथील मोहनजी सेंटर पुणे यांच्या चिमुकल्या मुलांनी २० मिनिटाचे रामायण नाट्यचे सादरीकरण करीत उपस्थितांचे मन जिंकले तसेच कुणाल मोरे यांचे डांस फ्लोर स्टुडियोच्या सदस्यांनी विविध गाण्यांवर नृत्य  करीत जमलेल्या नागरिकांनाही जल्लोष करीत धुराळा उडवला. सुनील अनिल तिलकधारी ग्रुप सदस्याने महादेव यांच्या  वेशभूषेत तांडव नृत्य सादर केले. रावणाची दहा डोकी दहा नकारात्मक प्रवृत्तीचे प्रतीक मानली गेली आहेत. ती प्रवृत्ती म्हणजे वासना,गर्व,अहंकार,मोह, क्रोध,लोभ,मत्सर, द्वेष व भय.. आणि या नकारात्मक प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी विजयादशमी या दिवशी रावणाचे प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते.रावण वध म्हणजे सत्याचा असत्यावर विजय,अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. केवळ रावणाच्या प्रतिमेचे दहन केले म्हणजे आपण प्रभू श्रीराम यांच्या सारखे मर्यादा पुरषोत्तम होऊ शकत नाही तर त्यासाठी आपल्या मध्ये असलेले रावण सारखे नकारात्मक प्रवृत्तीचा त्याग केला पाहिजे आणि प्रभू श्रीराममध्ये असलेले सकारात्मक गुण आत्मसात केले पाहिजे. 

यावेळी पालिका आयुक्त शेखर सिंह, आमदार अश्विनीताई जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यकारणी सदस्य श्री.  प्रकाशराव मीठभाकरे,विश्व हिंदू परिषदेचे श्री कुणाल साठे,माजी आमदार विलास लांडे,श्री. प्रभाकर वाघेरे ,श्री.चंद्रकांतअण्णा नखाते,श्री.मोरेश्वर शेडगे,श्री हर्षल ढोरे,श्री.तुषार कामठे,श्री.संतोष बारणे,श्री.प्रशांत शितोळे,युवा नेते विश्वजित बारणे,श्री संदिपभाऊ जाधव मा.नगरसेविका सौ. सविताताई खुळे,सौ.आरतीताई चोंधे,सौ.निर्मलाताई कुटे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. कुंदाताई भिसे तसेच  राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व पिंपळे सौदागर परिसरातील तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड,पुणे शहर मधील सर्वात मोठे रावण दहन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे,नागरिकांचे,पोलीस प्रशासनाचे, वाहतुक विभाग प्रशासन,अग्निशामक दल तसेच पालिका अधिकारी वर्ग यांचे नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत आभार व्यक्त करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय यांनी या  कार्यक्रमात अँकरिंग केले.