पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपळे सौदागर ते पिंपरीला जोडणाऱ्या जुन्या पुला लगत नविन समांतर पुल बांधण्यात येत असुन आज या कामाची पाहणी मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संबंधीत मनपा अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत केली, या पाहणी दरम्यान संबंधितांना सुचना केल्या की या पुलाचे काम करत असताना पिंपरीच्या बाजुने शेवटच्या स्लॅब चे काम गेली अनेक दिवस काम संथ गतीने सुरू आहे ते काम लवकरात लवकर पुर्ण करावे तसेच या पुलावरून ये – जा करणाऱ्या वाहनाची वर्दळ जास्त असुन नागरिकांना वाहतुकीच्या खोळंबण्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे, त्याबाबात देखील योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, तसेच या पुलाचे काम करत असताना पिंपरी कडुन पिंपळे सौदागर कडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील रस्त्याच्या उताराचे काम व्यवस्थीत करून हे काम करत असताना खोदण्यात येणाऱ्या दत्त मंदीर ते महादेव मंदीर पर्यत या रस्त्याच्या दोन्ही बाजुने व्यवस्थीत डांबरीकरण करण्यात याव्या अशा सुचना देखील संबंधित अधिकारी व ठेकेदार याना करण्यात आल्या. या पाहणीवेळी प्रकल्प कार्यकारी अभियंता बाप्पु गायकवाड, उपअभियंता अभिमान भोसले, ठेकेदार व्ही एम मातेरे कंपनीचे प्रोजक्ट मॅनेजर राजेश तनवे, इजिनियर, व इतर कर्मचारी उपस्थित होते.