पिंपळे सौदागरमध्ये कचरा समस्या गंभीर; ठेकेदारावर कारवाई करा – नाना काटे

0
288

पिंपरी दि. २६ पीसीबी) – रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील कचरा समस्या गंभीर झाली आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. दैनंदिन कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. या भागातील कचरा समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, महापालिकेतर्फे शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याचे काम अँन्थोनी ग्रुप प्रा.ली या कंपनीला दिले असून या कंपनीतर्फे रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील दैनदिन कचरा हा वेळेवर उचलला जात नाही. याबाबत विचारल्यास त्यांच्याकडून गाडी उशिरा येणार असल्याचे सांगण्यात येते. आरोग्य विभागातर्फे तो पर्यंत कचरा सोसायटी आवारात ठेवावा अश्या सूचना केल्या जातात. सोसायटी मधील हाउसकीपिंग कामगार हे सकाळच्या वेळेत उपलब्ध असतात, कचरा उचलणारी गाडी सायंकाळी येण्याच्या वेळेत कचरा टाकण्यास कोणी कर्मचारी भेटत नाही. अश्याने तो कचरा सोसायटी परिसरात राहतो. वेळेवर न उचलल्याने सोसायटी परिसरात दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

कंपनीच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या या नादुरुस्त अवस्थेत दिसून आल्या आहेत. तसेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी बघू करू सांगतो अशी उडवा उडवीची उत्तरे देतात. सोसायटी व परिसरात कचरा साठून राहणे व न उचलणे हि खूप गंभीर बाब आहे. रहाटणी, पिंपळे सौदागरमधील कचऱ्याची समस्या गंभी,,,र होत चालली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व दैनंदिन कचरा उचलणाऱ्या कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी निवेदनातून केली आहे.