पिंपळे सौदागरच्या विकासातील मोठा अडथळा दूर; अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्त्याचे काम अखेर सुरू!

0
6

नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे,नगरसेविका सौ. अनिता काटे आणि नगरसेविका सौ.कुंदा भिसे यांच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश; नागरिकांकडून समाधान

दि.२०(पीसीबी)-पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत कळीचा मानला जाणारा, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित असलेला १८ मी. ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे,नगरसेविका सौ. अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ.कुंदाताई भिसे यांच्या अथक परिश्रमातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम आज प्रत्यक्ष सुरू करण्यात आले.

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली…
पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागातून जाणारा हा रस्ता अनेक गृहप्रकल्पांना जोडणारा मुख्य दुवा आहे. मात्र, जमिनीचे अधिग्रहण, तांत्रिक त्रुटी आणि इतर काही कारणांमुळे या १८ मी रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम प्रलंबित होते.रस्ता अर्धवट असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास आणि वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडवण्यासाठी श्री शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार बैठका घेतल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सर्व अडथळे दूर केले.

या कामाच्या सुरुवातीवर बोलताना श्री.शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, “निवडणूक दरम्यान ट्रायोज आणि झूलेलाल टॉवर्स सोसायटी रहिवासी आणि सौदागरच्या नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण होताना पाहून आज मोठे समाधान वाटत आहे. ‘ट्रायोज-झूलेलाल टॉवर’ रस्ता हा केवळ सिमेंट-काँक्रीटचा रस्ता नसून तो या भागातील दळणवळणाची ‘लाईफलाईन’ आहे. अनेक तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले होते, मात्र आम्ही कच खाल्ली नाही. प्रशासनाशी सतत संवाद साधून आणि पाठपुरावा करून आम्ही आज हे काम मार्गी लावले आहे. दर्जेदार आणि जलद गतीने हे काम पूर्ण करून हा रस्ता लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. विकासाचा हा रथ आम्ही असाच पुढे नेत राहू.”

रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे स्थानिक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. भाजप लोकप्रतिनिधींनी दाखवलेली ही ‘राजकीय इच्छाशक्ती’ पिंपळे सौदागरला अधिक ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी उद्योजक श्री संदिप काटे,उद्योजक श्री संजय भिसे, श्री धनंजय भिसे तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.