पिंपळे निलख मध्ये टोळक्याचा राडा

0
285

एकावर खुनी हल्ला

पिंपरी, दि. १० (पीसीबी)- पिंपळे निलख येथे अंड्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारावर आठ जणांच्या टोळक्याने खुनी हल्ला केला. दुकानातील रोख रक्कम चोरून नेली. तसेच वाहनांची तोडफोड केली. आम्ही या भागातले भाई आहोत, असे म्हणत दहशत निर्माण केली. हा प्रकार बुधवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजता जीत एग्स सप्लायर्स या दुकानात घडला.

स्वप्नील अच्युतराव गायकवाड (वय 24, रा. पिंपळे निलख)असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी समीर राजेंद्र इंगवले (वय 36, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा सैफन शेख (वय 29, रा. पिंपळे गुरव), सोन्या क्षीरसागर, रामा हनुमंत कांबळे (वय 26, रा. बाणेर), अक्षय अहिवळे (रा. पिंपळे गुरव) आणि अन्य तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपळे निलख येथे अंडी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात काम करणारा कामगार अनिश मुरकुटे याचा भाऊ सौरव याचे अक्षय अहिवळे याच्या भावासोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपी दुचाकीवरून फिर्यादी यांच्या दुकानासमोर आले. त्यांनी कामगार अनिश मुरकुटे याला हॉकी स्टिकने मारले. त्यानंतर फिर्यादी यांच्या गाडीवरील चालक स्वप्नील गायकवाड याच्या डोक्यात हॉकी स्टिक मारून खुनी हल्ला केला. यात स्वप्नील गंभीर जखमी झाला.

त्यानंतर आरोपींनी दुकानातील अंड्याचे ट्रेमधील अंडी फोडून नुकसान केले. दमदाटी करत आम्ही उठेल भाई आहोत, असे म्हणत दशहत निर्माण केली. दुकानाच्या काउंटर मधून ४८ हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. अनिश मुरकुटे याने आणलेल्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. आरोपींनी पळून जाताना आणखी एका दुकानदाराला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.