पिंपळे निलखमध्ये गवतात आढळले जिवंत अर्भक

0
163

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपळे निलख येथील क्रांतीनगर परिसरात रस्त्याच्या बाजूला गवतामध्ये एक जिवंत अर्भक आढळून आले. ही घटना मंगळवारी (दि. 9) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.

रवींद्र रघुनाथ इंगवले (वय 46, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख मधील क्रांतीनगर येथे सटवाई मंदिराच्या पाठीमागील बाजूला अज्ञातांनी पुरुष जातीचे अर्भक मोकळ्या जागेत सोडून दिले. त्या अर्भकाचे वय एक दिवस आहे. हिरव्या रंगाच्या कापडात गुंडाळलेल्या अर्भकाचा आवाज आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.