पिंपळे गुरव मध्ये घरफोडी

0
58
crime

सांगवी,  दि. 15 (पीसीबी)

पिंपळे गुरव परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी दोन ते पावणेपाच वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलूप उघडून घरात प्रवेश केला. घरातून 46 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.