पिंपळे गुरवमध्ये सव्वा दोन लाखांची घरपोडी

0
76

30 जुलै (पीसीबी) पिंपरी,
बाथरूमच्या खिडकीवाटे प्रवेश करून चोरट्यांनी दोन लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. 27) घडली.

श्रावण गोटीराम उपरवत (वय 55, रा. साठ फुटी रोड, पिंपळे गुरव) यांनी सोमवारी (दि. 29) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादि यांचे घर शनिवारी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजताच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील बाथरूमच्या खिडकीवाटे घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सहा तोळे 22 ग्रॅम वजनाचे दोन लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व बारा तोळे वजनाचे पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.