पिंपळेसौदागर, रहाटणीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावा; माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची आयुक्तांसोबत बैठक

0
251

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – – पिंपळेसौदागर, रहाटणी परिसरातील प्रलंबित कामे मार्गी लावावीत. स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कुणाल आयकॉन रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांना गती द्यावी. कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पिंपळेसौदागर, रहाटणी परिसरातील प्रलंबित कामांबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, माजी नगरसेविका उषा मुंडे, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंगोळकर, राजेंद्र राजापूरे, अंबरनाथ कांबळे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी विविध रखडलेल्या कामांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. कुणाल आयकॉन रस्त्याच्या मागील बाजूस मिलीटरी हद्दीलगत सुरू असलेले 18 मीटर रुंद रस्त्याचे काम मार्गी लावावे. आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाला वेग द्यावा. या नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणा-या पाणी वाटपाबाबत लवकरात-लवकर नियोजन करावे. जेणेकरुन पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.

CBSE आणि ICSE बोर्ड मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना समाज विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत सहभागी करून घेणे. BMX पार्क, योगा पार्क या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेले HCMTR रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा. पिंपळेसौदागर मधील प्रलंबित डीपी रस्त्यांबाबत लक्ष देऊन मार्गी लावावेत, अशी मागणी काटे यांनी केली. आयुक्त शेखर सिंह यांनीही सर्व प्रश्न काळजीपूर्वक समजून घेतेल. प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे काटे यांनी सांगितले.