पिंपरी व्यापाऱ्यांचे एकाचवेळी गठ्ठा मतदान

0
218

दि १३ मे (पीसीबी ) – पिंपरी कॅम्प बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी एकाच वेळी गठ्ठा मतदान केले. पिंपरी चिंचवड कँम्प व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्या नेतृत्वाखाली येथील आडवाणी धर्मशाळेत आज सकाळी सर्वजण एकत्र जमले होते. एकसाथ मतदानासाठी ते रवाना झाले. जयहिंद शाळा तसेच देवधर हॉस्पटल समोरील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून सर्वांनी मदान केले. लोकशाही बळकट कऱण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी सांगितले.

या उपक्रमात श्याम मेंघराजानी, नीरज चावला, सुशील बजाज, प्रकाश रत्नानी, संजय नागदेव, जगदीश आसवानी, प्रकाश संगतानी, कैलास कुकरेजा, अनिल मुलचंडी, जय गोविंदवाणी, हरेश पगराणी, अनिल कटारिया, महेश मोटवानी, शाम कुकरेजा यांच्यासह बाजारपेठेतील तब्बल ३०० वर व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आणि उत्स्फुर्तपणे मतदान केले.