पिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल – चिंतन बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार !!

0
320

पिंपरी विधानसभेत भाजपा ची ताकत वाढविण्याचा कार्यकर्त्यांनी केला संकल्प..

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – जुलै रोजी राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पिंपरी विधानसभा सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मंथन बैठक भाजपा शहर कार्यालय मोरवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी बदलल्या राजकीय समीकरणाचा भाजपा संघटनावर काय परिणाम होत आहे, कार्यकर्त्यांचा काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख अमित गोरखे व विधानसभा प्रमुख कार्यकर्त यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

बदललेल्या राजकीय समीकरणा नंतर कार्यकर्ते यांच्या भावना समजून घेण्यासाठी मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीत भाजपा कार्यकर्ता संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व पुन्हा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित येऊन काम करणार आहोत. भाजपा कार्यकर्ते यांच्या भावनांची नोंद घेऊन आपल्या समस्या वरिष्ठ नेते यांच्या पर्यंत पोहचवल्या जाईल अशी माहिती पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी सांगितले.

राजकीय समीकरण जरी बदलले असले तरी भाजपा पक्ष हा अधिक सक्षमपणे पुढील वाटचाल करेल, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी झालेला बदल स्विकारून आपल्या पक्ष संघटनेस अधिक मजबूत केले पाहिजे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा हाच एक क्रमांक चा पक्ष असेल हा निर्धार करून आपण सर्वांनी अधिक जोमाने कामाला लागले पाहिजे. भोसरी विधानसभा अथवा शिरूर लोकसभेची जरी जबाबदारी माझ्यावर असली तरी पिंपरी विधानसभेतील सर्व कार्यकर्ते यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आहोत अशी ग्वाही शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली.

काही निर्णय व त्याचे परिणाम समजून येण्यासाठी वेळ लागतो त्या मुळे आपण सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन पुढील काळात वाटचाल केली पाहिजे असा सल्ला प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांनी दिला. या वेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक शीतल शिंदे, माउली थोरात, केशव घोळवे, अनुराधा गोरखे, सुजाता पालंडे, शैलेश मोरे, आर एस कुमार, प्रकाश जवळकर, विशाल वाळूंजकर इतरांनी आपली मनोगत व्यक्त केली मंडल अध्यक्ष विजय शिनकर, महेंद्र बाविस्कर, शर्मिला बाबर, कोमल शिंदे, कमलेश भारवाल, रेखा कडाली, संजय मोगाडेकर, कैलास कुटे, गणेश लंगोटे व मोठ्या संखेने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.