पिंपरी विधानसभेतून ६० हजार पेक्षा जास्त मतांचा लीड देणार

0
341
  • पिंपरी विधानसभेमधील 399 बूथ प्रमुख व वॉरिअरची बैठक संपन्न

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – ” महाविजय 2024 हे अभियान घेऊन भारतीय जनता पार्टीने,पिंपरी विधानसभा क्षेत्रात प्रचार बूथप्रमुखांच्या मेळाव्यात पुन्हा एकदा या देशात नरेंद्र मोदीजीच आणि त्यांचे सरकार येणार असा ठाम विश्वास दर्शविलेला आहे ” अबकी बार 400 पार, फिर एक बार, मोदी सरकार… !!! हा नारा संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी पिंपरी विधानसभाच्या वतीने देण्यात आला. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व अभियान नियोजित पद्धतीत वेळेत पुर्ण करणार व सर्व बूथ प्रमुख ते पक्षातील उच्च स्तरीय यंत्रणा काम करत आहे. या सेर्व घडामोडीत भाजपाच्या वतीने मतदारांना,लाभार्थांना मोदीजींच नमस्कार हे अभियान घरोघरी पोहचवणार तसेच देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींच्या विचाराचे सरकार पाहिजे हा विश्वास पुन्हा एकदा मतदारांमधे जागरुक करणार आहे. हे सर्व अभियान देशात तसेच प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदार संघात चालू आहे.

पिंपरी विधानसभेत बूथ प्रमुख व सुपर वॉरिअर्स यांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला संघटन मंत्री- श्री.मकरंद जी देशपांडे तसेच पिं.चिं भाजपा शहराध्य्क्ष श्री.शंकर भाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे सदाशिव खाडे व अमित गोरखे यांचे मार्गदर्शन लाभले. पिंपरी विधानसभेत एकुण ३९९ बूथ प्रमुख व १५३ सुपर वॉरियर अशा मोठ्या संख्येने या बैठकीला पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक बूथ प्रमुखाला तसेच सुपर वॉरिअर्स ला आपापल्या कामाची जबाबदारी काय आहे हे श्री मकरंद देशपांडे यांनी समजून सांगितली, यावेळी नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा देशाला पंतप्रधान म्हणून का हवे..? तसेच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सरकार काय यावे..? यासाठी जनमानसात आपण संपर्क करायचा आहे, तसेच मोदीजींनी दहा वर्षात देशाचा जो मान सन्मान या संपूर्ण जगात वाढवलेला आहे ,त्याची ही माहिती बूथ प्रमुखांच्या मदतीने सर्व मतदारांच्या पोहचवायची आहे. असेही सांगण्यात आले, श्री शंकर जगताप यांनी आपकी बार ४०० पार चा नारा दिला तर आमदार उमाताई खापरे यांनी बूथ सक्षमीकरण का महत्वाचे आहे याविषयी सांगितले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री महेश कुलकर्णी व मोरेश्वर शेडगे यांची नियुक्ती झाल्याने विशेष सत्कार करण्यात करण्यात आला..

या बैठकीला उपस्थित पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. मकरंदजी देशपांडे, भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप, आमदार सौ. उमाताई खापरे, प्रदेश सदस्य श्री. सदाशिवजी खाडे, श्री.संतोषजी कलाटे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री. राजेश पिल्ले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सुजाताताई पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. राजू दुर्गे,  जिल्हा सरचिटणीस श्री. संजय मंगोडेकर,मा.नगरसेवक श्री. शीतल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. माऊली थोरात, मावळ लोकसभा विस्तारक श्री. भूषण जोशी, चिंचवड विधानसभा विस्तारक श्री.सागर फुगे, माजी उपमहापौर श्री. केशव घोळवे, मा.नगरसेवक,मा.नगसेवक श्री.संदीप वाघेरे श्री. शैलेश मोरे, माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, पिंपरी विधानसभा विस्तारक श्री.नंदू कदम, पिंपरी दापोडी मंडल अध्यक्ष श्री. निलेश अष्टेकर, चिंचवड स्टेशन प्राधिकरण मंडल अध्यक्ष श्री.राजेंद्र बाबर,श्री. गणेश लंगोटे, श्री. कैलास कुटे, वैशाली खाडे यांच्यासह सर्व सुपर वॉरियर्स, बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते, सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन सौ मनिषा शिंदे यांनी व्यक्त केले. या संपुर्ण बैठकीचे नियोजन पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित जी गोरखे , व मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर व निलेश अष्टेकर यांच्या कडून करण्यात आले होते.