पिंपरी विधानसभेतील श्री रामभक्त स्पेशल रेल्वे श्रीराम दर्शनासाठी आज निघणार..

0
312

पिंपरी, दि. १० (पीसीबी): संपूर्ण भारतभरातून श्रीराम मंदिर राम लला प्राणप्रतिष्ठापनेनंतर भक्तांचा ओघ लागला असून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्न सर्व क्षेत्रांमध्ये आयोध्या दर्शनासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभेतील पहिल्या टप्प्यात विविध भागातील 300 नागरिक राम भक्त आज सायंकाळी अयोध्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती भाजपा विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी दिली.

अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नांतून पिंपरी विधानसभेतील हे सर्व राम भक्त अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार असून आज सायंकाळी आठ वाजता ही विशेष रेल्वे पुणे/ लोणावळा या ठिकाणाहून रवाना होणार आहे, त्यांची सर्व व्यवस्था या रेल्वेमध्ये करण्यात आली असून व अयोध्या मध्ये पोचल्यावर राहणे व श्रीराम दर्शन व्यवस्था तेथील शासनाच्या मदतीने करण्यात आलेली आहे. याच रेल्वेमध्ये मावळ चिंचवड ,उरण या विधानसभा क्षेत्रा मधील श्रीराम भक्त मोठ्या प्रमाणात असणार आहेत.
या विशेष सेवेसाठी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे ,आमदार अश्विनीताई जगताप ,आमदार उमाताई खापरे यांचे सहकार्य लाभले आहे…
१० फेब्रु ते १५ फेब्रू २०२४ असा हा प्रवास असेल …