पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज

0
53

मतदान अधिकारी कर्मचारी यांना केंद्रनिहाय साहित्य वाटप होणार
पिपरी दि. १८ (पीसीबी) – पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड ऑटोक्लस्टर मधील प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ याठिकाणी करणेत येणार आहे.
पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही चिंचवड येथील ऑटोक्लस्टर प्रदर्शन केंद्र क्र. १ व २ या जागे मध्ये होणार आहे.
साहित्य वाटप करण्याकरीता ५५ व स्वीकृतीसाठी ४५ कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारी सकाळी २१ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात करणार आहेत. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्त करण्यात येणार आहे.
मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये ७१ बसेस आणि ०४ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आलेला आहे. मतदान अधिकारी कर्मचारी यांचे वाहनाचे पार्किगंची सोय करणेत, आलेली आहे. तसेच अग्निशामक दलाचे वाहन, पाण्याचा टॅंकर, शीघ्र कृती दलाचे पथक,वैद्यकीय पथकासह रूग्णवाहिका उपलब्ध करणेत येणार आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३९१६०७ मतदार असून ३९८ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १७७७ (राखीवसह) अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साहित्य घेवून जाणाऱ्या प्रत्येक मतदान केंद्रासाठी पोलीस बंदोबस्त असून जीपीएस प्रणाली अद्यावत ठेवली आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी सुमारे २०% मतदान अधिकारी कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या ३९८ मतदान केंद्रांवर वेब कॅमेरे बसविणेत आलेले आहे तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत तिसरे व अंतिम प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुक मतदानाच्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्व तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.
दोन शीघ्र कृती दलाचे पथके तयार करणेत आली असून सोबत BEL कंपनीचे तज्ञ असणार आहेत. पथके ची ठिकाणी निश्चित करणेत आली असून कोणत्याही मतदान केंद्रावरून कॉल आल्यास १० मिनिटामध्ये शीघ्र कृती दलाचे पथके पोहचून मदत करणार आहे.

“मतदानाच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावावा.”

  • अर्चना यादव सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघ.
    पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघ.
    एकुण मतदार – ३९१६०७
    पुरूष मतदार – २०४००५
    स्री मतदार – १८७५६८
    तृतीयपंथी मतदार – ३४
    मतदान केंद्र – ३९८
    केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) – ३९८
    दिव्यांग मतदार संख्या – ४३४२
    वय वर्ष 85 +वरील मतदार संख्या – ४२१०
    मतदान अधिकारी/कर्मचारी – १७७७ (राखीवसह)
    ठिकाणे /शाळा इमारती – ८७
    सेक्टर ऑफीसर – ४५
    मास्टर ट्रेनर – १६
    युनिक मतदान केंद्र – कमलनयन बजाज हायस्कुल, संभाजीनगर उत्तरेकडुन
    केंद्र क्र. ४१ – खोली क्र ६
    युवा संचलित मतदान केंद्र – एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल श्रीधरनगर केंद्र क्र.१७९- खोली क्र २
    महिला संचलित केंद्र – ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय सेक्टर नंबर 25 उत्तरेकडून ,
    केंद्र क्र.५ – खोली क्रमांक 2
    दिव्यांग संचलित मतदान केंद्र – कामायनी मतिमंद मुलांची शाळा से. क्र २४ , निगडी
    केंद्र क्र. २०- खोली क्र २

परदानशीन मतदान केंद्र – ईकरा इंग्लिश मिडीयम स्कूल सर्वे नं. ८० दापोडी तळमजला
केंद्र क्र. ३८५- खोली क्रमांक ४
मॉडेल बुथ – गणेश इंग्लिश मिडियम स्कूल तळमजला
केंद्र क्र. ३७०- खोली क्रमांक १०
संवेदनशील मतदार केंद्र – ०
एकूण ईव्हीएम, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट – ३९८ मतदान केंद्रांसाठी राखीव सह ४७७ बॅलेट युनिट,
४७७ कंट्रोल युनिट आणि ५१७ व्हीव्हीपॅट मशीन
साहित्य वाटप कोठून केले जाणार – चिंचवड येथील ऑटोक्लस्टर प्रदर्शन केंद्र क्र. १ व २
ईव्हीएम व कर्मचारी वाहतूक व्यवस्था – पीएमपीएल बसेस ७१जीप ४
व्होटर स्लिपाचे घरोघरी वाटप झाले. – २,९९,७४३ (७६.५४%)
मतमोजणी दिनांक व वेळ – २३/११/२०२४, सकाळी ८.०० वा
मतमोजणी ठिकाण – वेटलिफ्टिंग हॉल ,श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी
मत मोजणी टेबल व फेरी – २० टेबल व २० फे-या टपाली मतमोजणी -३ टेबल,
सैनिक मतदान ETPBS-१ टेबल
मत मोजणीसाठी कर्मचार्‍यांची संख्या – ११९

एकूण पदनिर्देशित ठिकाणे- मतदान केंद्र संख्या – एकूण मतदान ठिकाणे – ८७
1Ps-5, 2Ps-14, 3Ps-16, 4Ps-14, 5Ps-09,
6Ps-14, 7Ps-04, 8 Ps-05, 9Ps-04, 10 Ps-00,
11 Ps-00, 12 Ps-01, 16 Ps-01
सोसायटी मध्ये घेणेत आलेली मतदान केंद्र (एकूण ६ मतदानकेंद्र) भाग यादी सह दिशादर्शक फलक लावले आहेत.

१.मतदान केंद्र166 – त्रिवेणी सहकारी गृहनिर्माण सोसायटी म्हाडा कॉलनी मोरवाडी पिंपरी
पार्किंग कापडी पार्टीशन खोली क्र. १
२. मतदान केंद्र167 – त्रिवेणी सहकारी गृहनिर्माण सोसायटी म्हाडा कॉलनी मोरवाडी पिंपरी
पार्किंग कापडी पार्टीशन खोली क्र. २
३. मतदान केंद्र168 – रिवरडेल सहकारी गृहनिर्माण सोसायटी म्हाडा कॉलनी मोरवाडी
पिंपरी पार्किंग कापडी पार्टीशन खोली क्र. १
४. मतदान केंद्र169 – रिवरडेल सहकारी गृहनिर्माण सोसायटी म्हाडा कॉलनी मोरवाडी
पिंपरी पार्किंग कापडी पार्टीशन खोली क्र. २
५. मतदान केंद्र 339 – मंत्री इंटेरनीटी सहकारी गृहनिर्माण सोसायटी म्हाडा कॉलनी मोरवाडी
पिंपरी पार्किंग कापडी पार्टीशन खोली क्र. १
६. मतदान केंद्र 340 – मंत्री इंटेरनीटी सहकारी गृहनिर्माण सोसायटी म्हाडा कॉलनी मोरवाडी
पिंपरी पार्किंग कापडी पार्टीशन खोली क्र. २

मतदारांसाठी केंद्रावरील सोयी / सुविधा- मतदानाच्या दिवशी मतदारांचे मदतीसाठी मतदान केंद्राच्या इमारतीच्या आवारामध्ये दर्शनी भागामध्ये मतदान केंद्राच्या रचनेचा नकाशा लावण्यात आलेला असून मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याची पाण्याची व्यवस्था, सावली मंडप,रांगेमध्ये आवश्यकतेनुसार बसण्यासाठी बेंच, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर व मदतनीस, दिव्यांग – 85+ वयावरील मतदारांना त्यांचे शारिरीक क्षमतेनुसार मतदानकेंद्रावर ने-आण करणेसाठी रिक्षा व कर्मचाऱ्यांसाठी वाहन सुविधा, मतदानकेंद्रावर मतदारांचे नाव शोधणेची सुविधा (बी.एल.ओ), मतदारांचे मदतीसाठी एन.सी.सी. व एन.एस.एस. चे स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मतदान केंद्रावर सप्तरंगात कलर कोडींग करण्यात येणार आहे.
मनपा मार्फत तयार करणेत येणाऱ्या हरित मतदान केंद्र यादी- १)ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय से. २५. २) सेंट उर्सुला हायस्कूल, निगडी ३) कमल नयन बजाज हायस्कूल (युनिक) ४) गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल (मॉडेल) ५) हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर