पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाविजयाचा भाजपचा नारा बुलंद !

0
132

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकून महाविजय मिळविणार आहे. त्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. आज पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सुपर वॉरियर आणि बुथ प्रमुखांची बैठक पार पडली. सर्वांना मार्गदर्शन करून मा. नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करून इतिहास घडविण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.*

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. मकरंदजी देशपांडे, भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप, आमदार सौ. उमाताई खापरे, प्रदेश सदस्य श्री. सदाशिवजी खाडे, श्री. महेश कुलकर्णी, श्री.संतोषजी कलाटे, श्री. मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. अमित गोरखे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री. राजेश पिल्ले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सुजाताताई पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. राजू दुर्गे, जिल्हा सरचिटणीस श्री. संजय मंगोडेकर, श्री. शीतल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. माऊली थोरात, मावळ लोकसभा विस्तारक श्री. भूषण जोशी, चिंचवड विधानसभा विस्तारक श्री.सागर फुगे, माजी उपमहापौर श्री. केशव घोळवे, श्री. शैलेश मोरे, माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, श्री. नंदू कदम, श्री. निलेश अष्टेकर, श्री. गणेश लंगोटे, श्री. कैलास कुटे यांच्यासह सर्व सुपर वॉरियर्स, बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.