पिंपरी विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार

0
52

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : पिंपरी विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा दावा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे. २०१९-२४ या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर जनेतेने टाकलेला विश्वास आमच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण आहे. महायुती सरकारने केलेली विकासकामे, लाडकी बहीण योजना तसेच जनकल्याणकारी विविध योजना यामुळे मतदारांना दिलासा मिळाला.

शहरातील मेट्रोचा निगडी पर्यंतचा विस्तार याच बरोबर मनपाचे विविध प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यामधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. मतदारसंघातील झोपडपट्टी तसेच मध्यमवर्गीय व सोसायट्यांमधील नागरिकांशी मी वैयक्तिक संपर्कात आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यावर माझा भर असतो. प्रत्येक घटक तसेच सर्वसामान्य मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. मी सामान्य जनतेची केलेली कामे अशा विविध कारणामुळे विजय आमचा आहे, त्यामुळे गुलाल आम्हीच उधळणार आहोत असे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे.