पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षा द्वारे नुकतीच विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून अमित गोरखे यांची प्रदेश भाजपा द्वारे नियुक्ती करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने झालेली विकास कामे सर्व नागरिकांना कळावी. तसेच येणाऱ्या निवडणुकी साठी पक्ष संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने पिंपरी विधानसभा संघटन भाजपा च्या कामांचा शुभारंभ कासारवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आला.
या नंतर परिसरातील बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या भेटीचे घरोघरी भेटी चे नियोजन करण्यात आले.
या वेळी पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, माजी नगरसेवक, माऊली थोरात,स्वीकृत सदस्य – कुणाल दशरथ लांडगे, प्रकाश जवळकर सूनीलनाना लांडगे, गजानन मोरे, गदिया सुरेश, देवदत्त लांडे, संतोष टोणगे,गणेश जवळकर, हर्षल भोसले, गणेश संभेराव, सुहास जाधव, बापूसाहेब भोसले, बाळासाहेब लांडे, युवराज लांडे इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.