पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सायकल प्रेमी नागरिकांना 447 सायकलींचे माफक दरात वाटप

0
248

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पूर्वी पुणे(पिं.चिं) शहर हे सायकल चे शहर म्हणून ओळखल जात होते. त्या नंतर काळ बदलत गेला मोटार सायकल आल्या तसा तसा पर्यावरणाचा ही समतोल ही बिगडत गेला.आज पुन्हा आपल्याला पर्यावरणाचा समतोल तसेच आपले आरोग्य(फिटनेस)ही सांभाळता येइल आशा साठी आपण पुन्हा एकदा सायकल हा पर्याय निवडावा. असे अमित गोरखे यांनी पिं.चि शहरातील नागरिकांना आवाहन केले.आज संपुर्ण पिं.चिं शहरातील नागरिकांना अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नातून अत्यंत माफक दरात सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या.या वेळी पहिल्या टप्यात 447 सायकल चे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शहरात सायकल चे प्रमाण वाढावे यासाठी सामाजिक उपक्रमाच्या हेतूने अमित गोरख यांनी हा पुढाकार घेऊन ही संकल्पना राबवली.

यावेळी मा.नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की सायकल ही पुन्हा काळाची गरज बनत चालले आहे. सायकल ही पर्यावरण आणी शारिरीक आरोग्या साठी सुद्धा महत्वाची आहे.लहान मुलां पासून ते जेष्ठा पर्यंत सर्वांसाठी महत्वाची आहे. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी,कैलास कुटे,गणेश लंगोटे,नंदू भोगले,सूर्यकांत मोहिते,तसेच संभाजी नगर चिंचवड मधिल महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघातील बबन दत्तात्रय वाडेकर, रामदास जाधव, सोपान साबळे बाबासाहेब शिंदे यशवंत ठाकूर विलास पवार महादेव भडांगे कैलास तापकीर आदी सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.