पिंपरी येथे हुक्का पार्लरवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

0
1127

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी येथील साई चौकात असलेल्या रौनक बार अॅंड रेस्टोरंट मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 29) मध्यरात्री सव्वा बारा वाजता करण्यात आली.

राजू आजबार शेख (वय 23, रा. कैलासनगर, पिंपरी), विक्रम बख्तरपुरे (रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मनोज राठोड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू याने विक्रम याच्या सांगण्यावरून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना रुफटॉपवर जेवणासोबत मद्य आणि तंबाखूजन्य हुक्का उपलब्ध करून दिला. या बार मध्ये हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत 10 हजार 300 रुपये किमतीचा हुक्का फ्लेवरचे डबे आणि इतर मुद्देमाल जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.