“पिंपरी मेट्रो कामात पाणी वाया; कडक कारवाईचे आदेश”

0
2

दि. २५ ( पीसीबी ) – निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रिल मशीन पोकलॅण्ड ने रस्त्यावर बोरिंग खोदण्यात येत असताना त्या ठिकाणी पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन मेट्रो रेल्वे ठेकेदार ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रिल मशीन पोकलॅण्ड ने रस्त्यावर खड्डे खोदताना पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात गेले. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी मेट्रो रेल्वे ठेकेदार ह्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, सध्या उन्हाळा सुरू असून शहरात पाणी पुरवठा तुटवडा असल्याने मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यासंदर्भात ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर यांनी त्या भागात संपर्क केला.