पिंपरी मार्केट मधून आयफोन पळवला

0
185

 पिंपरी ,दि २६ (पीसीबी) –  पिंपरी मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा आयफोन चोरीला गेला आहे ही घटना शनिवारी दिनांक 25 दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शगुन चौक पिंपरी येथे घडली.

महिलेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पिंपरी मार्केट मधील शगुन चौकात इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या त्या क्रिस्टल लाईट्स या दुकानात खरेदी करत असताना त्यांचा चाळीस हजार रुपये किमतीचा आयफोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.