पिंपरी महापालिकेत राष्ट्रगीताचे समूह गायन

0
256

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मावळते आयुक्त राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक यांनी समूह राष्ट्रगीत गायन केले.

आज सकाळी ठीक 11 वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, सचिन ढोले, चंद्रकांत इंदलकर, संदिप खोत,रविकिरण घोडके, मनोज लोणकर, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. उज्वला आंदूरकर, डॉ. मनिषा सूर्यवंशी, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहायक आयुक्त, वामन नेमाणे, बाळासाहेब खांडेकर, श्रीकांत जोशी, श्रीनिवास दांगट, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, बाबासाहेब गलबले, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, पदाधिकारी मनोज माछरे, उमेश बांदल, माजी नगरसेवक सचिन चिखले, यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील अधिकारी कर्मचारी यांच्याद्वारे आज समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतीवीरांचे तसेच थोर व्यक्तींचे स्मरण यावेळी करण्यात आले. विविधतेने नटलेल्या परंपरांचा तसेच संस्कृतींचा नामोल्लेख करत देशभक्ती, देशप्रेम वाढीस लावून देशाप्रती असलेली एकनिष्ठता तसेच देशाची एकता, एकात्मता, अखंडता, सार्वभौमता आणि अबाधित राखण्यासाठी निर्धारपूर्वक संकल्प या माध्यमातून करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारित असलेल्या मानवी मूल्यांचे जतन करत देशाला बलशाली करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

राष्ट्रगीतामधून होणारे देशाचे मंगलगान आपल्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करत असते. शिवाय सेवेची भावना देखील यातून वृद्धिंगत होत असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कल्याणकारी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यामध्ये साहित्य अमृत ग्रंथोत्सव, व्याख्यानमालेचे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून अनेक पुस्तक प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. तसेच 21 ऑगस्ट 2022 रोजी ‘भारताची सद्य आर्थिक स्थिती’ या विषयावर प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.