पिंपरी प्रमाणेच हिंजवडीतही मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक

0
85

पिंपरी, दि. १२ –
पुणे शहर देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाचे शहर झाले आहे. पुणे शहरात अनेक माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत. परंतु आता जागतिक स्तरावरील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पुन्हा पुणे शहरात जमीन घेतली आहे. आता मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजेवाडीत 16.4 एकर जमीन घेतली होती. 520 कोटींत हा सौदा झाला आहे. ही जमीन इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपीने मायक्रोसॉफ्टला विकल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत मायक्रोसॉफ्टने एकूण 848 कोटींची जमीन खरेदी केली आहे. यापूर्वी 2022 मध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये 328 कोटींत 25 एकर जमीन घेतली होती.

मायक्रोसॉफ्ट इंडियाचा पुण्यातील हा दुसरा मोठा जमीन करार आहे. यापूर्वी कंपनीने येथे 25 एकरचा भूखंड 328 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यावेळी मायक्रोसॉफ्टने फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून ही जमीन घेतली होती. आता मायक्रोसॉफ्ट हिंजेवाडीत घेतलेल्या जमिनीवर कंपनी कसला प्रकल्प उभारणार आहे? त्यांची माहिती मायक्रोसॉफ्टकडून अद्याप दिली गेली नाही. राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी परिसरातच आहे. पुण्याचे आयटी सर्व्हिसेस हब आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणून हा भाग मानला जातो.

2 दशलक्ष लोकांना एआय शिकवणार
पुण्यात घेतलेल्या जमिनीचा व्यवहार ऑगस्ट महिन्यात झाला होता. त्यासाठी 31.18 कोटी रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. 6 सप्टेंबर रोजी ही नोंदणी झाली आहे. 2024 च्या सुरुवातीला, मायक्रोसॉफ्टचे भारतातील प्रमुख कौशल पहल म्हणाले होते की, त्यांचा उद्देश 2025 पर्यंत 2 दशलक्ष लोकांना आर्टिफिशल इंटेलिजेन्स आणि डिजिटल कौशल्ये शिकवण्याचे आहे. त्यामुळे कंपनीची भारतातील रणनीती तेव्हाच स्पष्ट झाली.
मायक्रोसॉफ्टने या वर्षांच्या सुरुवातीला हैदराबादमध्ये 267 कोटीत 48 एकर जमीन घेतली होती. कंपनी त्या ठिकाणी आपला डेटा सेंटर उभारणार आहे. गूगल आणि अ‍ॅमेजॉनसोबत मायक्रोसॉफ्ट डेटा ‘हायपरस्केलर’ आणि डेटा लोकलाइजेशनमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. ऑपरेशनल आणि डेटा केंद्रांव्यतिरिक्त, मायक्रोसॉफ्टकडे हैदराबाद, बंगळुरू आणि नोएडामधील केंद्रांमध्ये सुमारे 23,000 कर्मचारी कार्यरत आहेत.