पिंपरी – पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश आर. एस. वानखेडे, आर. एम. गिरी, पी. सी. फटाले, एस. पी. कुलकर्णी यांची विविध ठिकाणी बदली झाली असल्यामुळे पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, दिनांक १० मे २०२४ रोजी वकील बार रूम येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. गजभिये, बी. डी. चौखंट, एम. जी. मोरे, ए. एम. बगे, एम. ए. आवळे, व्ही. एन. गायकवाड तसेच आजी माजी अध्यक्ष आणि वकील बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि कार्यकारणीद्वारे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विविध वकील बांधवांनी आपल्या मनोगतांमधून न्यायाधीश साहेबांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले होते. वकील बांधवांनी त्याचा आस्वाद घेत जुन्या हास्यविनोदासह आठवणींना उजाळा दिला. डिजीनोटीस एप्लीकेशनचे ॲप डेमो व प्रेझेंटेशन यशपाल बावीसकर आणि टीमने केले. त्यांनाही वकील बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, खजिनदार ॲड. अजित खराडे, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड.आयाज शेख, ॲड. फारूख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. स्वाती गायकवाड, ॲड. मीनल दर्शले यांनी केले. सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. सदस्य ॲड. आयाज शेख यांनी आभार मानले.