पिंपरी न्यायालयात जामिनासाठी चुकीची कागदपत्रे सादर केल्याने जामीनदारावर गुन्हा दाखल

0
137

जामिनासाठी जामीनदार म्हणून चुकीची कागदपत्रे सादर केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 5) दुपारी पिंपरी न्यायालयात उघडकीस आला.

आकाश अशोक कांबळे (वय 30, रा. चिखली रोड, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी न्यायालयातील सहायक अधीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे पिंपरी न्यायालयात सहायक अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. एका गुन्ह्यात आरोपीच्या जामिनासाठी आरोपी आकाश कांबळे हा जामीनदार होता. त्याने त्याच्या नावाची म्हणून चुकीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. ही बाब चव्हाण यांच्या पडताळणी मध्ये आढळून आली. त्यामुळे आकाश कांबळे याने न्यायालयाची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.