पिंपरी चिंचवड मराठा समाजाची रविवारी महत्वाची बैठक

0
62

पिंपरी, दि. ३० – वाकडचे माहेर असलेल्या वैष्णवी हगवणे-कस्पटे हुंडाबळी प्रकऱणावर आता मराठा समाज एकवटला आहे. पुणे शहरातील मराठा समाजाने काही क्रांतिकारी निर्णय केले आहेत, आता पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मराठा बांधव याच विषयावर ठोस भूमिका घेणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. १ जून २०२५ रोजी. सकाळी ११.३० वाजता त्यासाठी बैठकिचे आयोजन काळेवा़डी येथे केले आहे. जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

प्रसिध्दीपत्रात भोईर यांनी म्हटले आहे की, या बैठकित काही महत्वाच्या सामाजिक विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या *शहरातील कन्या वैष्णवी हगवणे – कस्पटे हिच्या बाबतीत जी दुर्घटना घडली त्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभर पडले आहेत. या घटनेमुळे मराठा समाजाबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे पुणे शहरातील सकल मराठा समाजाने लग्न व्यवस्थेसंदर्भात एकत्र बैठक घेऊन काही अटी व नियम लागू केलेले आहेत. याच धर्तीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या धोरणात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कै. वैष्णवीस श्रद्धांजली देण्यासाठी व समाजाची भविष्यातील वाटचाल व त्यासंदर्भात काही नियम व धोरणे निर्धारित करण्यासाठी या बैठकीस समाजबांधवांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकिसाठी स्थळ :- आरंभ बँक्वेट, बी.आर.टी.रोड, काळेवाडी, पुणे – १७