पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

0
338

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार शुक्रवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि ॲड. सतीश गोरडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी कार्यकारिणीतील ॲड. रामराजे भोसले (अध्यक्ष), ॲड. प्रतीक्षा खिलारी (उपाध्यक्ष), ॲड. धनंजय कोकणे (सचिव), ॲड. मोनिका सचवाणी (महिला सचिव), ॲड. उमेश खंदारे (सहसचिव), ॲड. अजित खरोडे (खजिनदार) आणि सदस्य ॲड. फारूख शेख, ॲड. अय्याज शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. स्वाती गायकवाड, ॲड. मीनल दर्शले, ॲड. अस्मिता पिंपळे यांची उपस्थिती होती. चंद्रकांतदादा पाटील यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.