पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून तसेच विलो मॅथर आणि प्लाट यांच्या अर्थसहाय्याने तयार करण्यात आलेल्या ‘माझी नदी – माझीच जबाबदारी’ या नदी विषयक दालनाचे भव्य उद्घाटन आज पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे संपन्न झाले.,
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता झाली. या प्रसंगी श्री. प्रवीण तुपे,संस्थापक संचालक पिं.चिं.सायन्स पार्क, श्री.संजय कुलकर्णी मुख्य अभियंता पिं.चिं.मनपा, श्री. प्रवीण लडकत सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता पिं.चिं.मनपा, डॉ.सुधीर आगाशे, डीन, पी.सी.सी.ओ.पी., डॉ. श्रद्धा खंपरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी पिं.चिं.सायन्स पार्क आणि डॉ. अरुण डी. लिमगावकर, श्री. बाफना, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. सावंत जे.एस.पी.एम. विद्यापीठ पुणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात नदी संवर्धन, जलशुद्धीकरण आणि पाण्याच्या शाश्वत वापराबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या दालनाचे प्रत्यक्ष उद्घाटन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क निर्मित ‘आपली जीवन वाहिनी’ या लघुपटातील बालकलाकार — डी. आय. सी. स्कूलमधील विद्यार्थी रमणी वैद्य, अवनी बर्वे, वीर बाबर आणि ओजस जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. श्रद्धा खंपरिया यांना ‘पवनामाई पर्यावरण जलमित्र २०२५’ तर डॉ. अरुण डी. लिमगावकर यांना ‘पवनामाई जलमित्र २०२५’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उद्घाटनानंतर उपस्थितांना दालनाची व्हर्च्युअल टूर दाखवण्यात आली. या टूरदरम्यान नदी दालनाची माहिती श्री. लक्ष्मीकांत भावसार यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी माधुरी ढमाले आणि विराज सवाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सूर्यकांत मुथियान यांनी केले. या अभिनव अशा नदी दालनाच्या निर्मिती साठी श्री.राजू भावसार, श्री. शिरीष पांडव तसेच जलदिंडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली व महाराष्ट्रातील एकमेव असे नदी दालन जनतेसाठी सायन्स पार्कच्या माध्यमातून खुले करण्यात आले.














































