पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची आज रात्री आठ वाजता महत्वाची बैठक

0
500

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे प्रमुख नेते शिवेसना सोडून एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याने पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता या बंडाचा संघटनेवर कितपत परिणाम संभवतो त्याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेची एक बैठक आज रात्री आठ वाजता आयोजित कऱण्यात आली आहे. विधानसभा उपसभापती निलम ताई गोऱ्हे, शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर व आमदार पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ अहिर हे यावेळी मार्गदर्शन कऱणार आहेत.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित राहणार आहेत. सीझन बँक्वॉट दुर्गानगर चौक यमुनानगर – निगडी येथे पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेत बैठकीस उपस्थित राहावे. प्रत्येकाने उपरणे आणि भगवा झेंडा आणणे बंधनकारक आहे, अशा सुचना संघटनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांनी केली आहे.