पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलांतर्गत निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांची उचलबांगडी

0
401

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. ४) उचलबांगडी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी (दि. ५) देखील १७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्याबाबतचे आदेश दिले.

सतीश नांदूरकर (सांगवी वाहतूक विभाग येथून गुन्हे शाखा युनिट २), ज्ञानेश्वर साबळे (आळंदी पोलीस ठाणे येथून म्हाळुंगे पोलीस चौकी), रवींद्र जाधव (दिघी आळंदी वाहतूक विभाग येथून पोलीस नियंत्रण कक्ष), शिवाजी गवारे (पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न येथून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे), श्रीराम पौळ (रावेत पोलीस ठाणे येथून पोलीस नियंत्रण कक्ष), शहाजी पवार (नियंत्रण कक्ष येथून दिघी आळंदी वाहतूक विभाग), रघुनाथ उंडे (पिंपरी वाहतूक विभाग येथून निगडी पोलीस ठाणे), शंकर बाबर (गुन्हे शाखा युनिट ३ येथून विशेष शाखा), जितेंद्र कदम (भोसरी पोलीस ठाणे येथून जलद प्रतिसाद पथक), रामदास इंगवले (गुन्हे शाखा युनिट ५ येथून दरोडा विरोधी पथक), अरविंद पवार (म्हाळुंगे पोलीस चौकी येथून भोसरी पोलीस ठाणे), राम राजमाने (चिंचवड वाहतूक विभाग येथून युनिट ३), दशरथ वाघमोडे (म्हाळुंगे पोलीस चौकी येथून दिघी पोलीस ठाणे), किशारे पाटील (चिंचवड पोलीस ठाणे येथून म्हाळुंगे पोलीस चौकी), मधुकर माणिकराव खंडाळे (आर्थिक गुन्हे शाखा येथून युनिट ५), नितील लांडगे (भोसरी पोलीस ठाणे येथून तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे) या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली.

अधिकाऱ्यांमध्ये धाकधूक
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. जवादवाड यांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली केल्याचे आदेशात नमूद आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांची आरसीपी पथक येथे बदली झाली. आळंदी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक इकबाल इस्माईल शेख, अशोक नागू गांगड या दोघांना देखील नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. या दोन अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमवारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलीस आयुक्तालयातील इतर अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.