पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष हरिदास नायर यांचे निधन

0
222

पिंपरी दि. १८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष हरिदास नायर (वय ७५) यांचे आज दुपारी देहूरोड येथे कार्यक्रमात भाषण करत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या मगे पत्नी,मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे. निगडी येथील श्रीकृष्ण मंदिराचे ते संस्थापक अध्यक्ष होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॉंग्रेसमध्येच राहिले. ते लायन्स क्लबच्या आणि मल्याळी समाजमच्या माध्यमातून ते सतत सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी व्हायचे.

पिंपरी चिंचवड शहरातील मल्याळी समाजाचा ते खऱ्या अर्थाने ते चेहरा होते. त्यांना अनेक संघटना संस्था कडून पुरस्कार प्राप्त झालेले आहे .अनेक संस्था संघटनेचे ते पदाधिकारी होते. नुकताच १४ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.राजकीय,सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक,औद्योगिक,सर्व क्षेत्रात ते कार्यरत होते.