पिंपरी चिंचवड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे नियोजन.

0
143

पिंपरी, दि. २ ऑगस्ट (पीसीबी) – मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यात 11 ऑगस्ट रोजी मराठा जनजागृती व भव्य शांतता रॅली होणार आहे त्याच्या नियोजना संदर्भात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांच्या वतीने साई संस्कार संस्था संभाजीनगर पिंपरी चिंचवड येथे काल तातडीची नियोजन बैठक घेण्यात आली प्रामुख्याने यामध्ये रॅली संदर्भात प्रचार व प्रसार कशा प्रकारे करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पिंपरी चिंचवड मधून निघणारी रॅली ही भक्ती शक्ती चौक निगडी या ठिकाणाहून सुरू होईल  या रॅली मध्ये देहू रोड, मावळ या भागातून येणारे मराठा बांधव भक्ती शक्ती येथे रॅलीत सहभागी होतील तर काळेवाडी, रहाटणी भागातील मराठा बांधव हे पिंपरी चौकात या रॅलीमध्ये सहभागी होतील,

खेड, जुन्नर व चाकण या भागातून येणारे मराठा बांधव हे नाशिक फाटा येथे या रॅलीमध्ये सहभागी होतील ही रॅली एकत्रित पणे भक्ती शक्ती चौकातून सकाळी ठीक 9 वाजता निघेल 09:15  वाजता पिंपरी चौकात पोहोचेल तर 09:30 वाजता ही रॅली नाशिक फाटा येथे पोहोचेल व पुण्यातील सारसबागच्या दिशेने वाटचाल करेल त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे रॅली सुरू होण्याची वेळ सकाळी 11 वाजता असेल तर रॅलीचा मार्ग हा सारसबाग -बाजीराव रोड- आप्पा बळवंत चौक -शनिवार वाडा -छत्रपती शिवाजी महाराज फुल -छत्रपती शिवाजी महाराज स्मारक -जंगली महाराज रोड -बालगंधर्व चौक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन (अलका टॉकीज) असा असेल प्रत्येक समाज बांधवांनी रॅलीला येतांना स्वतःसोबत पिण्याच्या पाण्याची बॉटल व बिस्किट पुडा बरोबर ठेवावा असे कालच्या बैठकीमध्ये रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे, पिंपरी चिंचवड शहरात व जिल्ह्यात ठीक ठिकाणी 11 ऑगस्ट च्या रॅली संदर्भात जाहिरात करण्यासाठी स्टिकर,होर्डिंग, फ्लेक्स,भगवे झेंडे मोठ्या प्रमाणात लावून जनजागृती करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला पिंपरी चिंचवड शहरांमध्ये विभाग वाईज बैठकांचे सत्र उद्यापासून प्रत्येक भागात,सोसायट्यां मध्ये सुरू करण्याच्या सूचना सर्व समाज बांधवांना देण्यात आल्या आहेत पिंपरी चिंचवड मधील सर्व मराठा समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार दुचाकीवरून या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा,सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले.