पिंपरी चिंचवड शहरात २० जुलै रोजी होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेचा टिझर आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून रिलिज करण्यात आला आहे.

0
220

सस्नेह निमंत्रण
लोकनेते शरद पवार साहेब येतायत..
आपल्याशी संवाद साधायला.. आपणही नक्की या..

नमस्कार,
आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, महाराष्ट्राचे भाग्यविधाते लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयी संकल्प मेळाव्यासाठी येत आहेत.. आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीय धोरणात्मक राजकीय सामाजिक वाटचालीत त्यांनी आपल्या देशासह, महाराष्ट्राचा तसेच आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अविस्मरणीय योगदान दिले आहे.

सर्वांगसुंदर पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार असणाऱ्या आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीय धोरणांमुळेच गेल्या 50 वर्षांत आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. म्हणूनच येत्या शनिवारी दि. 20 जुलै 2024 रोजी पिंपरी येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालय या ठिकाणी सायंकाळी ठीक 4.00 वाजता आयोजित भव्य विजयी संकल्प मेळावा प्रसंगी आपल्या कुटुंबियांसह, मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती..

ज्यांच्यामुळे आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले, आपल्या सर्वांचे आयुष्य सुखकर झाले, अशा पवार साहेबांना ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण बहुसंख्यने आवर्जून उपस्थित राहाल, ही मनस्वी अपेक्षा..
धन्यवाद..!

कार्यक्रम स्थळ : नवमहाराष्ट्र महाविद्यालय, पिंपरी गाव, पिंपरी
शनिवार दि. 20 जुलै 2024 सायंकाळी 4:00 वाजता