- विविध मान्यवरांची उपस्थिती
दि.६ (प्रतिनिधी) इक्वेस्टेरियन असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड व आमदार उमाताई खापरे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच अश्वारोहण /घोडेस्वारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सदर स्पर्धा ही दिनांक ०८ व ०९ नोव्हेंबर रोजी संत तुकाराम नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे आयोजित केली आहे.
सदर स्पर्धेमध्ये अश्वारोहणांमधील विविध प्रकारांमध्ये शंभर पेक्षा अधिक खेळाडू सामील होणार आहेत या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता तर बक्षीस वितरण समारंभ दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता होणार आहे. या स्पर्धांच्या निमित्ताने शहरवासीयांना एका आगळ्यावेगळ्या खेळाची अनुभूती घेण्याची संधी प्राप्त होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष राजेश भुजबळ यांनी केले आहे.















































