पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित जनजागर यात्रेस सर्व सामान्य जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रारंभ

0
309

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विरोधी पक्षनेते अजितदादा पवार राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार श्रीमती फौजिया खान यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा सौ.विद्याताई चव्हाण, राज्य निरिक्षक डॉ.आशाताई मिरगे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, कविता म्हेत्रे, वैशालीताई नागवडे, शितल हगवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेची सुरुवात केली. जनजागर यात्रेत प्रामुख्याने भाजप विरोधातील महागाई, बेरोजगारी, वेतन, बेताल वक्तव्य, शेतकरी असंतोष, महिला सुरक्षा, अशा सर्व विषयांवर यल्गार करण्यात आला. या यात्रेत सर्व नेते आजी-माजी नगरसेवक सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

जनजागर यात्रेच्या माध्यमातून पिंपरी व भोसरी विधानसभेत प्रत्येक दोन कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम पिंपरी येथे डीलक्स चौक, पिंपरी याठिकाणी तेथील सर्व सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत सभा घेऊन प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर खंडोबा माळ चौक, आकुर्डी तसेच रुपीनगर-तळवडे व शेवटची सांगता सभा पीएमटी चौक, भोसरी येथे घेण्यात आली.

शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्ष कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नेत्या मंगलाताई कदम, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राहुल भोसले, शाम लांडे, फजल शेख, विनोद नढे, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, उषाताई संजोग वाघेरे, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, निकिता कदम, कविता खराडे, वर्षा जगताप, इम्रान शेख, यश साने, विनायक रणसुभे, सतीश दरेकर, संजय उदावंत, दिपक साकोरे, विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, अक्षय माछरे, संजय औसरमल, इकलास सय्यद, वैशाली काळभोर, प्रसाद कोलते, विशाल काळभोर, संगीता ताम्हाणे, प्रवीण भालेकर, नारायण बहिरवाडे, संजय वाबळे, पौर्णिमा रविंद्र सोनवणे, दत्तात्रय जगताप, सारिका पवार, शितल पवार, युवराज पवार, संदीपान झोंबाडे, संतोष निसर्गंध, चंद्रकांत वाळके, जालिंदर बापू शिंदे, अनुराधा गोफणे, प्रसाद कोलते, मंदाताई आल्हाट, विनया तापकीर, अमिना पानसरे, शमीम पठान, गोरक्ष लोखंडे, सुरेखा लांडगे, स्वाती माई काटे, उषा काळे, शांती सेन, तृप्ती मोरे, सचिन औटे, सुनिता अडसुळ, सुप्रिया सोळांकुरे, लता ओव्हाळ, संगिता कोकणे, ज्योती तापकिर, मिरा कदम, पूनम वाघ, मनिषा गटकळ, ज्योती गोफणे, सविता धुमाळ, विश्रांती पाडाळे, दिपाली देशमुख, मिरा कुदळे, सारीका पवार, पल्लवी पांढरे, निर्मला माने, विष्णू शेळके, किरण देशमुख, विनय शिंदे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.