पिंपरी-चिंचवड शहरातील ४१ सोसायट्यांना महापालिकेची नोटीस

0
558

पिंपरी,दि.०१(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील एसटीपी प्रकल्प बंद असलेल्या 41 सोसायट्यांना महापालिकेने नोटिसा दिल्या आहेत. 11 डिसेंबर पासून नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाईचा इशारा दिला आहे. केंद्र शासनाचा 1 डिसेंबर 2016 च्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रालयाने 20, 000 चौ.मी. बांधकाम अथवा बांधकाम प्रकल्पाकरीता प्रकल्पाच्या आवारात तयार होणा-या सांडपाण्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे.

तसेच नवित एकत्रीत बांधकाम व विकास नियमावली, महाराष्ट्र मधीन नियम 13.4 च्या तरतुदीनुसार 10,000 चौ.मी. व त्यावरील मोठ्या क्षेत्रफळाच्या बांधकामाकरीता पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. नियमावलीनुसार प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर न करणाऱ्या सोसायट्यांचे नळ कनेक्शन कारवाई करुन बंद करण्याची तरतुद आहे.

महापालिकेने एजन्सीची नेमणुक केली असून खाजगी सोसायट्यांच्या मैलाशुद्धीकरण केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तसेच ज्या सोसायट्यांचे कार्यान्वित नाहीत. पिण्याव्यतिरिक्तच्या वापराकरीता पाण्याचा पुनर्वापर होत नाही अशा सोसायट्यांना नियमावलीनुसार नोटीमा देणेत आलेल्या आहेत. बहुतेक सोसायट्यांनी STP कार्यान्वित केले असुन 41 सोसायट्यांमार्फत सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झाला नाही. त्यामुळे 11 डिसेंबर पासून नळ कनेक्शन बंद करणेची कारवाई करण्यातत येणार आहे.