पिंपरी चिंचवड शहरातील “साडे बारा टक्के परतावा व रेड झोन रद्द” प्रश्नी सचिन काळभोर करणार काळे झेंडे दाखवून पंतप्रधान मोदींचा निषेध

0
472

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान करणार आंदोलन

पिंपरी दि.०३ (प्रतिनिधी)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी (०५ ऑक्टोबर) पुणे दौऱ्यावर असुन निगडीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर हे शेतकऱ्यांच्या प्रलंबित साडे बारा टक्के परतावा तातडीने मिळण्यासाठी व शहरातील रेड झोन रद्द करण्याच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करणार आहेत यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाधिकारी यांना याविषयी निवेदन दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, ” देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक ०५/१०/२०२३ रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून तसेच पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन रद्द करण्यात यावा म्हणून रस्त्यावर उभे राहून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळण्यासाठी गेल्या ४६ वर्षांपासून संघर्ष करावा लागला असून गेल्या अधिवेशनात नागपूर येथे पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून आमदार महेश लांडगे ह्यांनी लक्षवेधी प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता त्या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांनी १५ दिवसांत पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येईल म्हणून जाहीर आश्वासन दिले होते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध तीन दौऱ्यावर जाहीर भाषणात पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येईल म्हणून जाहीर घोषणा केली होती सन २०१७ रोजी निवडणुकीत दोन्ही आमदारांनी पिंपरी चिंचवड शहरात १०० होर्डिंग बोर्ड साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येणार म्हणून प्रश्न सोडविण्यात आला म्हणून शहरातील गल्ली बोळात तसेच मुख्य चौकात लावले होते तसेच पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र २००० यार्ड कमी करुन फक्त ५०० मीटर करण्यात यावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य नागरिक मागणी करत असून त्या संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच मनोहर पर्रीकर शरद पवार ह्यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील दिघी, बोपखेल, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, रावेत, किवळे, तळवडे, मोशी, चिखली, निगडी व पिंपरी भागातील संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात आली नाही. सन २०२२ रोजी डॉ. निलम गोऱ्हे ह्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन नवीन नकाशा प्रसिद्ध करण्यात यावा म्हणून विधानसभा येथे मागणी केली होती त्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी सन २०२२ रोजी नवीन रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र नवीन नकाशा पिंपरी चिंचवड शहरातील अकरा गावांमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता त्या अकरा गावांमध्ये रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र २००० यार्ड रद्द करून ५०० मीटर करण्यात यावे म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक मागणी करत असून त्या संदर्भात निर्णय घेतला जात नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दिनांक ०५/१०/२०२३ रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा तसेच पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन रद्द करण्यात यावा म्हणून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येणार असून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब व पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांना निवेदन देण्यात आले आहे, असे त्यात नमुद केले आहे.